akshay kumar 
मनोरंजन

'राम सेतू' टीमची अयोध्यावारी; 'जय श्री राम' म्हणत करणार शूटिंगचा श्री गणेशा  

सकाळन्यूजनेटवर्क

बॉलिवूडमध्ये खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमारचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या चित्रपटातील अभिनयाने आणि स्टन्टने तो प्रेक्षकांचे मन जिंकतो. बच्चन पांडेचे शुटींग संपवून आता 'राम सेतू' या चित्रपटाच्या शुटींगसाठी अक्षय सज्ज झाला आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरुचा आणि अक्षय रामजन्मभूमी आयोध्याला रवाना झाला आहे. नुकताच अक्षयने जॅकलिन आणि नुसरतसोबतचा विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  हे तिघेही खासगी विमानाने मुंबईतून अयोध्याला रवाना झाले आहेत. अक्षयने या फोटोला कॅप्शन दिले,'एक खास चित्रपट, एक खास सुरुवात. टीम अयोध्याला रवाना झाली आहे. हा प्रवास सुरू झाला आहे आणि आम्हा सर्वांना तुमच्या शुभेच्छा आवश्यक आहेत'. या फोटोला अक्षयच्या चाहत्यांनी कमेंट करून शुभेच्छा दिल्या. काही महिन्यांत या चित्रपटाच्या काही भागाचे अयोध्येत शूट केले जाईल. त्यानंतरच्या राहिलेल्या भागाचे शूटिंग मुंबईत होणार आहे.

राम सेतू चित्रपटात अक्षय पुरातत्वशास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे.  या चित्रपटाचे कथानक तर्क, विज्ञान आणि इतिहासवर आधारित आहे. राम सेतू चित्रपटाचा पोस्टर पाहून अक्षय कुमारच्या चाहत्यांना चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांनी चित्रपटाबद्दल एका मुलाखतीत सांगितले की,'अक्षय या चित्रपटात पुरातत्वशास्त्रज्ञच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील त्याची भूमिका आणि लूक अनेक भारतीय शास्त्रज्ञांची प्रेरणा घेऊन करण्यात येत आहे. अक्षय त्याच्या चित्रपटातील नव्या लूकने फॅन्सला अश्चर्यचकित करायला तयार आहे.

'कोरोनाच्या काळात चित्रपटाचे शुटींग होणार असल्याने त्याच्यासाठी घेण्यात येणाऱ्या काळजीबद्दल प्रोड्युसर विक्रम म्हनोत्राने मुलाखतीत सांगितले,'राम सेतू चित्रपटाच्या लोकेशनवर सर्व प्रोटोकॅाल्सचे पालन करण्यात येणार आहे. वाहतूक,बायो-बबल्स, हेल्थ चेक अप ही सर्व काळजी घेण्यात येणार आहे. चित्रपटातील vfx चित्रीकरणासाठी प्रोडक्शन पुढील काही महिने वेगवेगळ्या शेड्युलमध्ये होईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT